Kolhapur Crime News : शहापुरात जुन्या वादातून मित्राचा खून, संशयित ताब्यात

मारेकरी व मयत दोघेही आगर ता. शिरोळ येथील
Kolhapur Crime News
Kolhapur Crime News : शहापुरात जुन्या वादातून मित्राचा खून, संशयित ताब्यातFile Photo
Published on
Updated on

Friend murdered over old dispute in Shahapur, suspect in custody

यड्राव : पुढारी वृत्तसेवा

शहापूर येथे गावाकडील जुन्या वादातून मित्राच्या डोक्यात, तोंडावर, मानेवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात गणेश रमेश पाटील (वय 21) (रा. आगर ता. शिरोळ) याचा उपचारादरम्यान मृत्य झाला. ही घटना लोटस पार्क कमानी समोरील शहापूर हद्दीत मोकळ्या मैदानात शुक्रवारी रात्री घडली.

Kolhapur Crime News
Blood Donation : राज्यात रक्तदात्यांच्या नोंदणीत कोल्हापूर ‘टॉप 10’मध्ये

यामुळे शहापूरसह आगर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अभिषेक सुकुमार मस्के (वय 19) रा.आगर ता.शिरोळ याला पोलिसांनी रात्री उशीरा ताब्यात घेतले आहे. याबाबतची फिर्याद नामदेव गणपती चव्हाण वैशाली रा. कोरोची यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

गणेश व अभिषेक हे दोघे मित्र असून मुझे अगर येथे एकाच परिसरात राहतात. या दोघांमध्ये दोन वर्षांपूर्वी गावाकडील काही वाद होता. तो वाद मिटविला होता. या रागातून लोटस पार्क कमानी समोरील शहापूरकडे जाणाऱ्या मार्गावर अभिषेक व गणेश यांच्यामध्ये वाद झाला. यातून अभिषेक यांने सोबत आणलेल्या कोयत्याने गणेश याच्या डोडोक्यात मानेवर तोंडावर वार केले. गणेश रक्ताच्या थारोळ्यात पडला. हे पाहून अभिषेक तिथून पळून गेला.

Kolhapur Crime News
kolhapur : लीना नायर यांचा ‘कमांडर ऑफ द ऑर्डर’ पुरस्काराने गौरव

मार्गावरून येणाऱ्या नागरिकांनी याबाबतची माहिती शहापूर पोलिसांना कळवली. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन गणेशला इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला सांगली सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आले.

घटनास्थळी व इंदिरा गांधी रुग्णालयात पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी व उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांनी भेट देऊन माहिती घेतली व तपासाबाबत सूचना दिल्या. दरम्यान काही तासातच गंभीर जखमी गणेश याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संशयित आरोपी अभिषेक मस्केला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news