

कोल्हापूर : ‘पुढारी’ माध्यम समूहाच्या वतीने होतकरू वकिलांसाठी शनिवारी (दि. 9) मोफत व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे होत असल्याने हे मार्गदर्शनपर व्याख्यान घेण्यात येणार आहे.
शहाजी लॉ कॉलेज व खंडपीठ कृती समितीच्या सहकार्याने होणार्या या व्याख्यानाला आझाद चौकातील डी. आर. के. कॉलेज ऑफ कॉमर्सच्या (कॉमर्स कॉलेज) प्रा. पुष्पा देशपांडे-राशिवडेकर हॉल येथे सकाळी नऊ वाजता प्रारंभ होणार आहे.
‘उच्च न्यायालयासमोरील सराव आणि प्रक्रिया : संधी आणि आव्हाने’ या विषयावर होणार्या व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून अॅड. व्ही. डी. संकपाळ, अॅड. विक्रम एन. वालावलकर आणि अॅड. युवराज नरवणकर मार्गदर्शन करणार आहेत. या व्याख्यानासाठी प्रवेश नोंदणी आवश्यक आहे. ज्यांना प्रत्यक्षात उपस्थित राहता येणार नाही, त्यांना ऑनलाईन यूट्यूबवरही याचा लाभ घेता येणार आहे.
रजनीताई मगदूम, अॅड. प्रसाद मगदूम, अॅड. विश्वनाथ मगदूम, अॅड. वैभव पेडणेकर, अॅड. अमित बडकर, अॅड. संतोष शहा, अॅड. इंद्रजित चव्हाण, अॅड. शिवप्रसाद वंदुरे-पाटील, प्रा. सुहास पत्की उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत वकिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खंडपीठ कृती समिती व शहाजी लॉ कॉलेज यांनी केले आहे.