डॉ. लकडावाला यांच्या शिबिरातून विद्यार्थ्यांना प्रेरणा : मंत्री मुश्रीफ

सीपीआरमध्ये मोफत लॅप्रोस्कॉपी शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन
free-laparoscopy-camp-inaugurated-at-cpr-hospital
कोल्हापूर : सीपीआर येथे मोफत लॅप्रोस्कॉपी शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन करताना मंत्री हसन मुश्रीफ. सोबत अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, डॉ. शिशिर मिरगुडे, डॉ. मुफज्जल लकडावाला, प्रशासक के. मंजुलक्ष्मी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले आदी. Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातर्फे आयोजित डॉ. मुफज्जल लकडावाला यांच्या मोफत लॅप्रोस्कॉपी शस्त्रस्क्रिया शिबिरातून सर्वसामान्यांना मोफत उपचार मिळतील. तर वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या, सेवा देणार्‍या डॉक्टरांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळेल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. शनिवारी सीपीआर येथे लॅप्रोस्कॉपी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, शिबिरात पित्ताशय, गर्भाशय, पिशवी काढणे, हार्निया, गुडघ्यावरील शस्त्रस्क्रिया होणार आहेत. सर्व शस्त्रस्क्रिया यंत्राद्वारे बिनटाक्याच्या करण्यात येणार आहेत. शिबिरासाठी मिरेल कंपनीने वैद्यकीय साहित्य पुरवठा केला आहे. पाच ते सहा लाखांपर्यंत खर्च येणार्‍या शस्त्रस्क्रिया समाजसेवेच्या भावनेतून डॉ. लकडावाला येथे मोफत करणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालयासह राज्यात सर्व ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांसोबत एक विशेष शस्त्रस्क्रिया भाग सुरू करून भविष्यात येथील शस्त्रस्क्रियांबाबत आवश्यक ती आम्ही मदत देऊ, अशी ग्वाही डॉ. लकडावाला यांनी दिली. वैद्यकीय संचालक डॉ. अजय चंदनवाले यांनीही मार्गदर्शन केले. महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे उपस्थित होते. आभार अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news