38 lakh embezzlement Case | श्री दत्त महिला पतसंस्थेत 38 लाखांचा अपहार

38 lakh embezzlement Case |
38 lakh embezzlement Case | श्री दत्त महिला पतसंस्थेत 38 लाखांचा अपहार
Published on
Updated on

पन्हाळा : शिंदेवाडी (ता. पन्हाळा) येथील श्री दत्त महिला ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे माजी मॅनेजर विलास धोंडीराम पवार याच्यासह डॉ. किरण बाळासो माने, रविकुमार बाळासो माने, संगीता किरण माने व दीपाली रविकुमार माने (सर्व रा. माजगाव ) या पाचजणांनी संगनमताने संस्थेचा 38 लाख 37 हजार 429 रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लेखापरीक्षक आनंदा महिपती यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी विलास पवार याने 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2025 या कालावधीत मॅनेजरपदाचा गैरवापर केला. त्याने ठेवीदारांची रक्कम संस्थेत जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. तसेच संस्थेची रोख शिल्लक कमी दाखवण्यासाठी बनावट खर्चाच्या पावत्या तयार केल्या. याशिवाय पवार याने माने कुटुंबातील सदस्यांशी संगनमत करून बनावट व अपुर्‍या कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याचे दाखवून संस्थेच्या निधीची लूट केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news