High return scam | जादा परताव्याचे आमिष दाखविले; पाहुण्याने 14 .83 लाखाला फसवले

8 टक्के परतावा दाखवून शेअर मार्केटमध्ये गुंतवावयास लावले पैसे
High return scam |
इचलकरंजी : फसवणूकप्रकरणी संशयित प्रकाश म्हेतर याला न्यायालयात हजर करताना पोलिस.
Published on
Updated on

इचलकरंजी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून जादा परताव्याचे आमिष दाखवत 14 लाख 83 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी प्रकाश सूर्यकांत म्हेतर व प्रिया प्रकाश म्हेतर (दोघे रा. दत्तनगर, कबनूर) या दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला. त्यापैकी प्रकाश म्हेतर या संशयितास अटक केली. याप्रकरणी अभिषेक मोहन लिपारे (रा. तारदाळ) यांनी फिर्याद दिली आहे, अशी माहिती पो.नि. शिवाजी गायकवाड यांनी दिली.

फिर्यादी अभिषेक लिपारे व संशयित प्रकाश म्हेतर हे नातेवाईक आहेत. म्हेतर यानेे लिपारे यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत दरमहा 8 टक्के मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्या ओळखीतूनच व म्हेतर यांच्या सततच्या विनंतीवरून लिपारे यांनी 12 लाख 43 हजार, तर त्यांचे सहकारी प्रमोद लक्ष्मण पोवार व दत्तात्रय चाळाप्पा होडगे यांनी 2 लाख 40 हजार रुपये म्हेतर यांना गुंतवणूक करण्यासाठी दिले. ही सर्व रक्कम अभिषेक ट्रेडर्स या खात्यावर वेगवेगळ्या तारखांना देण्यात आली.

परंतु, गुंतवणूक करून सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही म्हेतर यांच्याकडून परतावा मिळाला नाही. त्यामुळे लिपारे यांनी चौकशी करत पैशांची मागणी करत पैसे न दिल्यास पोलिसांत तक्रार देऊ असे सांगितले. त्यावर म्हेतर याने पैसे बुडाले आहेत, असे म्हणत खोट्या गुन्ह्यात अडकवीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे. संशयित प्रकाश म्हेतर याला अटक करून न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news