

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज (शनिवार) विशिष्ट सेवेसाठी पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्यासह महाराष्ट्रातील चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक घोषित करण्यात आले आहे.