

तारदाळ : जुन्या भांडणाचा राग मनात धरून सहा ते सात तरुणांनी ओम नर्मदे, गणेश नर्मदे यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी नर्मदे यांच्या घरात घुसून सागर नर्मदे व वसंत चौगुले यांना डोक्यात व तोंडावर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना तारदाळमध्ये शुक्रवारी रात्री घडली.
याप्रकरणी सुजल नलवडे, जय ऊर्फ सोन्या ओगले, यश ओगले, हेमंत मुसळे, युवराज ऊर्फ प्रितम खांडेकर, विजय शिंदे (सर्व रा. खोतवाडी) यांच्यावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरा संशयितांना ताब्यात घेतले आहे. सरपंच यांचे पती रणजित पोवार यांनाही फोनवरून जीवे मारण्याची धमकी देऊन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न संशयित आरोपींनी केला आहे.