kolhapur | चार सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार

kolhapur |
kolhapur | चार सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार
Published on
Updated on

कोल्हापूर : खंडणी, खुनाच्या प्रयत्नासह विनयभंग यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या चौघा सराईत गुंडांना पोलिसांनी चार वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या कारवाईस मंजुरी दिल्याची माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी दिली. या चौघांनाही ताब्यात घेऊन त्यांची रवानगी जिल्ह्याबाहेर केली.

विशाल बबन जाधव ऊर्फ मांगुरे (वय ३१, रा. प्रगतीनगर, पाचगाव), निखिल शशिकांत लोहार (३२, रा. वेताळ तालीम, शिवाजी पेठ), सुशांत ऊर्फ पेद्या महेश सरनाईक - कांबळे (३०, रा. फिरंगाई मंदिर, शिवाजी पेठ), राहुल शामराव चौगुले (३०, रा. तिरंगा चौक, शिवाजी पेठ) यांच्यावर कारवाई केली. विशाल मांगुरेसह चौघांवर गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांच्या हद्दपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावावर सुनावणी घेऊन यास शनिवारी मंजुरी देण्यात आली.

या चौघांना जुना राजवाडा

पोलिसांनी तातडीने अटक करून त्यांची रवानगी जिल्ह्याबाहेर केली. विशालवर खुनाचा प्रयत्न, गर्दी, मारामारी असे ५, सुशांतवर विनयभंग, खंडणी असे ३, निखिलवर मारामारी, खुनाचा प्रयत्न, विनयभंग असे ३, तर राहुलवर दरोडा, मारामारीचे ३ गुन्हे दाखल आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news