Kolhapur : घोडागाडी शर्यतीत अपघात; चार घोडागाडी चालकांसह दुचाकीस्वार जखमी

कोल्हापूर घोडागाडी अपघात
कोल्हापूर घोडागाडी अपघात

शिरोली एमआयडीसी, पुढारी वृत्तसेवा : पुलाची शिरोली (ता.हातकणंगले) येथे बिरदेव शिवलिंग यात्रा आणि पीर अहमदसो उरूस आयोजित केला होता. या उरुसाच्या निमित्ताने घोडागाडी, बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी (दि.13) सकाळी अकराच्या दरम्यान गावातील माळवाडी परिसरात डबल घोडागाडी स्पर्धेची शर्यत सुरू झाली. ही शर्यत डांबरीकरण असलेल्या रस्त्यावर आयोजित करण्यात होती. या शर्यतीत घोड्याचा पाय घसरल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात घोडागाडीसहित चालक ही रस्त्यावर आदळला.

या अपघातात घोडागाडीच्या पाठोपाठ असलेली घोडागाडी त्या रस्त्यावर कोसळली त्यात घोडेही गंभीर जखमी झाले. तसेच यामध्ये दोन्ही गाड्यांच्या चालकासह एक दुचाकीस्वार ही जखमी झाला. शासनाने पुन्हा शर्यती सुरू करताना प्राण्यांच्या सुरक्षा बाबतीत नियम व अटी घालून दिल्या आहेत. एका बाजूला नियम व अटीचे पालन करत असल्याचे सांगितले जाते, पण डांबरी रस्त्यावर या नियमबाह्य स्पर्धा घेतल्याचं दिसून निदर्शनास आले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news