चंदगड : उमगावात पूराच्या पाण्यातून वाहून गेलेल्या चार म्हैशींचा मृत्यू

वाहत जावून बंधाऱ्यात अडकल्याने म्हैशींचा मृत्यू
Four buffaloes died after being swept away by flood waters in Umgaon
उमगावात पूराच्या पाण्यातून वाहून गेलेल्या चार म्हैशींचा मृत्यूPudhari File photo
Published on
Updated on

उमगाव येथील सावतवाडी येथील हिरगा रामा गावडे या शेतकऱ्याच्या चार म्हशी पूराच्या पाण्यातून वाहून गेल्या होत्या. या चारही म्हशींचा एका बंधाऱ्यात अडकून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.2) समोर आली आहे.

Four buffaloes died after being swept away by flood waters in Umgaon
चंदगड : जंगमहट्टीत जमिनीच्या वादातून महिलेस मारहाण

गावडे हे आपल्या चार म्हशी शुक्रवारी (दि.2) सकाळी चारण्यासाठी रानात घेऊन गेले होते. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर जवळच्या ओढ्याला पाणी आले. काही वेळात पाण्याची पातळी वाढली तसेच यामधून म्हैशी वाहून गेल्या. गरीब कुटुंबातील शेतकऱ्याच्या ४ म्हशी वाहून गेल्याने त्याचे ३ लाखांचे नुकसान झाले. प्रशासनाने मदत जाहीर करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहें.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news