Mahesh Kakade Death | माजी परीक्षा संचालक महेश काकडे यांचे गोव्यात निधन

Mahesh Kakade Death |
Mahesh Kakade Death | माजी परीक्षा संचालक महेश काकडे यांचे गोव्यात निधन
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे माजी संचालक महेश अनंत काकडे (वय ६२) यांचे शुक्रवारी गोवा येथे निधन झाले.

काकडे यांनी शिवाजी विद्यापीठात २३ जुलै २०१४ ते २८ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत परीक्षा नियंत्रक, तर १ मार्च २०१७ ते २२ जुलै २०१९ या काळात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालकपद भूषविले. स्थापत्य अभियांत्रिकीचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या काकडे यांनी २३ वर्षे अध्यापन क्षेत्रात योगदान दिले. तसेच, इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशनचे अध्यक्षपद भूषविले. दोन नोव्हेंबरला गुणवंत शिक्षकांच्या सत्कार कार्यक्रमात भाग घेण्यासाठी ते गोवा येथे गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

दरम्यान, शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक सुरू असताना निधनाचे वृत्त समजताच कामकाज थांबवून डॉ. काकडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कुलगुरू डॉ. आर. के. कामत म्हणाले, परीक्षा व्यवस्थेच्या आधुनिकीकरणात आणि विविध कालसुसंगत सुधारणांच्या अंमलबजावणीत काकडे यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.