Nanasahib Gat | जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाट यांचे निधन

Nanasaheb Gat passed away
Nanasahib Gat | जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाट यांचे निधन
Published on
Updated on

हुपरी : सामाजिक, राजकीय, सहकार, कला, क्रीडा चळवळीत सहा दशके कार्य करणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब फक्कड गाट (वय 80, रा. हुपरी) यांचे शनिवारी सकाळी 7 वाजता निधन झाले.

जैन धर्माच्या परंपरेनुसार त्यांना यमसल्लेखना देण्यात आली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून 1992 मध्ये पहिल्यांदा स्वीकृत व त्यानंतर सलग दोन वेळा स्वबळावर निवडून येत सलग 15 वर्षे ते कार्यरत राहिले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर विराजमान होताच त्यांनी सुमारे 13 कोटी रुपये खर्चाची नळ पाणीपुरवठा योजना राबवून शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढला. उच्च विद्याविभुशित (एम.ए.) शिक्षण घेतलेल्या गाट यांनी ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषद अध्यक्ष अशी संपूर्ण हयात राजकारणात घालविली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news