‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त भोजन वाटप

ओसवाल परिवारातर्फे आयोजन; गरीब-गरजूंनी घेतला लाभ
memorial day of 'Pudhari' Padma Shri Dr. G. G. Jadhav
कोल्हापूर : ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त ओसवाल परिवार यांनी गरीब व गरजूंना भोजन दिले. भोजन वाटप करताना ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव. सोबत जयेश ओसवाल, शैलेश ओसवाल, वैभव ओसवाल, किशोर घाटगे आदी. (छाया : पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर : ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त ओसवाल परिवार, कोल्हापूर यांनी बुधवारी भोजन वाटप केले. सीपीआर चौक येथे गेल्या सहा वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या कोल्हापूर थाळी येथे या उपक्रमाचे आयोजन केले होते. ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्या हस्ते भोजन वाटप करण्यात आले.

ओसवाल परिवार गेल्या सहा वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे. बुधवारी दिवसभरात शेकडो नागरिकांनी भोजनाचा आस्वाद घेतला. चपाती, भाजी, भात आणि शिरा याचा भोजनामध्ये समावेश होता. दुपारी 12.30 ते 2 पर्यंत भोजन वाटप सुरू होते. यावेळी उद्योजक जयेश ओसवाल, शैलेश ओसवाल, वैभव ओसवाल, शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर घाटगे, कोल्हापूर थाळीचे संयोजक उदय प्रभावळे यांच्यासह कोल्हापूर थाळीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news