केंबुर्णेवाडीत पिंजर, गवताच्या २ गंज्या जळून खाक

शेतकऱ्याचे सुमारे २० हजारांचे नुकसान
Kolhapur fire incident
केंबुर्णेवाडी येथे आगीत संतोष निवळे यांच्या जळालेल्या गवताच्या गंज्या Pudhari Photo
Published on
Updated on

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : विशाळगड मार्गावरील केंबुर्णेवाडी (ता. शाहुवाडी) येथे आज (दि. ९) दुपारी १२ च्या सुमारास घरामागील शेतात असलेली पिंजराची आणि गवताच्या दोन गंज्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. या आगीमुळे संतोष गणपत निवळे या शेतकऱ्याचे सुमारे २० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष निवळे हे आपल्या शेतातील बांधावरील कचरा साफ करत होते. याच दरम्यान अचानक आग लागली आणि वाऱ्यामुळे रौद्र रूप धारण केले. काही क्षणातच संपूर्ण परिसर धुराने वेढला. विशेष म्हणजे, ही आग त्यांच्या घराशेजारी आणि रस्त्यालगत असलेल्या विशाळगड पोलिस नाक्याजवळ घडल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, वाऱ्याच्या वेगामुळे आगीची तीव्रता अधिक असल्याने पिंजराची आणि दुसरी गवताची गंजी पूर्णपणे जळून खाक झाली.

Kolhapur fire incident
‘अलमट्टी’प्रश्नी सांगली, कोल्हापूर, सातारा बंद करू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news