अब्दुल लाट : अब्दुल लाट (ता-शिरोळ) येथील अब्दुल लाट - हेरवाड या मुख्य रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने संपर्क तुटला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुक बंद झाली आहे. तर लाट- हेरवाड मार्गे हेरवाड, तेरवाड, कुरुंदवाड, नृसिंहवाडी हा मार्ग बंद झाला आहे.
दुपार पर्यत जरी या भागात पावसाचे प्रमाण जरी कमी असले तरीही पंचगंगा नदी पात्रातील वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे या भागात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तर अब्दुल लाट -हेरवाड येथील रस्त्यावर सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान जवळपास दीड ते दोन फूट पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. येथील अनेक गावांचा थेट असणारा संपर्क तुटला आहे. तर पाचवा मैल येथील पर्यायी मार्गाचा अवलंब केला जात आहे. परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर अब्दुल लाट मार्गे हेरवाड, कुरुंदवाडला जाणाऱ्या वाहन धारकांना देखील रस्ता बंद झाला असून रस्त्यावर बॅरिगेट लावण्याची व्यवस्था करण्यात येत होती. सायंकाळी 6 च्या सुमारास परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान येथील प्रशासन, तलाठी, पोलीस पाटील मानसिंग भोसले, ग्रामपंचायत सदस्या वर्षा पाटील तसेच परिसरातील ग्रामस्थ रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याचे वाहन धारकांना माहिती व सूचना देत होते.