

राधानगरी : राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा येथे बिबट्याने पाच शेळ्यांचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाटपन्हाळा येथील शिवाजी बाबू बोडके यांनी मागील आठवड्यात त्यांच्या पाच शेळ्या बेपत्ता झाल्याची तक्रार वन विभागाकडे केली होती. चार दिवसांनी पाटपन्हाळा येथील भोसले यांच्या शेतामध्ये तीन शेळ्या अर्धवट खाल्लेल्या व कुजलेल्या अवस्थेत सापडल्या. पंचनामा करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे. घटनास्थळी बिबट्या आणि बछड्यांच्या पायाचे ठसे आढळून आले. वनपाल एस. एस. कांबळे, वनरक्षक भाग्यश्री कुंभार आणि वनमजूर यांनी भेट दिली.