

Fire breaks out at bus workshop in Shiroli Industrial Estate, loss worth lakhs
शिरोली एमआयडीसी : पुढारी वृत्तसेवा
शिरोली औद्योगिक वसाहतीतील चौगुले इंडस्ट्रीज प्रा. लि. या बसच्या वर्कशॉपमध्ये लागलेल्या आगीत बसच्या नव्या जुन्या सिट जळून खाक झाल्या. तात्काळ आग विझविण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीत सुमारे एक लाख रुपये किंमतीचे साहित्य जळून खाक झाले.
शिरोली औद्योगिक वसाहतीतील चौगुले इंडस्ट्रीज प्रा. लि. या एस एम एल इसुझू या या ट्रॅव्हल्स बसचे वर्कशॉप आहे. या कंपनीत आज (सोमवार) सकाळी नेहमीप्रमाणे कर्मचारी कामावर रुजू झाले. साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वेल्डिंगचे काम सुरू होते. यावेळी जवळपास असलेल्या बसच्या जुन्या काँयर फोम सीटला आग लागली.
थोड्या वेळात आग भडकली. जवळपास असलेल्या जुन्या कागदपत्रांनाही आग लागली. या लागलेल्या आगीत बसच्या नव्या-जुन्या सिट्स जळून खाक झाल्या. तात्काळ आग विझविण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला.
या आगीत सुमारे एक लाख रुपये किंमतीचे साहित्य जळाले. आग आटोक्यात आणण्यासाठी कोल्हापूर येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी व कंपनीतील कर्मचाऱ्यांनी मोलाचे काम केले.