आळते येथे पत्रावळी कारखान्याला आग

आगीत मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज
Fire at Patrawali factory in Alte
आळते : रामलिंग रोडलगत पत्रावळी कारखान्याला लागलेली भीषण आग.Pudhari File Photo
Published on
Updated on

आळते : आळते (ता. हातकणंगले) येथे शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास रामलिंग रोडलगत असलेल्या ग्रीनवेल इको फ्रेंडली अ‍ॅग्रो प्रॉडक्ट तयार करणार्‍या पत्रावळी कारखान्याचा बॉयलर भडकल्याने कारखान्याला मोठी आग लागली. कारखान्यात पत्रावळी बॉक्स पुठ्ठे यांचा साठा असल्याने बघता बघता आगीचा भडका उडाला व संपूर्ण कारखाना जळून भस्मसात झाला.

अग्निशामक दलाच्या सात बंबांनी आग आटोक्यात आणली. आगीत मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कामगार बाहेर पडल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. रामलिंग रोडवरील पत्रावळ्यासह इको फ्रेंडली वस्तू बनविण्याच्या मोठा कारखाना आहे. या कारखान्यात दररोज 250 ते 300 कर्मचारी काम करतात. येथील बॉयलरसाठी उसाच्या पाचटापासून तयार केलेले जळण दगडी कोळसा आणि बगॅसचा वापर केला जात होता. शनिवारी सकाळी 11 वाजता कारखान्याचा बॉयलर भडकल्याने कारखान्यातील कामगारांची धावपळ उडाली. यावेळी शिल्लक जळण आणि शेजारील तयार मालाला आग लागली. आग इतकी झपाट्याने पसरली की, कामगारांना बाहेर पडणे मुश्कील झाले.

आगीत तयार माल, कच्चा माल, मशिनरीसह कारखाना भस्मसात झाला. इचलकरंजी महापालिका, पंचगंगा साखर कारखाना, शरद साखर कारखाना, जयसिंगपूर नगरपालिका, घोडावत उद्योग समूहासह हातकणंगले नगरपंचायत, पेठवडगाव नगर परिषद यांच्या अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या. घटनास्थळी हातकणंगले पोलिसही दाखल झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news