Bhogavati Sugar Factory : भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध

Bhogavati  Sugar Factory : भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध

राशिवडे: पुढारी वृतसेवा: परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या (Bhogavati Sugar Factory) पंचवार्षिक निवडणुकीसाठी पक्की (अंतिम) यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये राधानगरी व करवीर तालुक्यातील 27,561 मतदार पात्र ठरले आहेत. त्यामुळे पुढील निवडणूक प्रक्रियेकडे लक्ष लागून राहिले आहे. परंतु पावसाळ्याच्या तोंडावर कार्यक्रम जाहीर झाला, तर उर्वरित निवडणूक प्रक्रिया, मतदान सप्टेंबरमध्येच होण्याची शक्यता आहे.

कारखान्याने (Bhogavati Sugar Factory) प्रसिद्ध केलेल्या कच्च्या मतदार यादीवरील 2,683 सभासदांच्या अपात्रेबाबत सर्वपक्षियांनी हरकत घेतली होती. यावर सुनावणी होऊन ते सभासद अपात्र ठरविण्यात आले. आज प्रशासनाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये राधानगरी तालुक्यातील 14255 अ वर्ग, तर 277 ब वर्ग असे 14532 सभासद पात्र ठरले आहेत. तर करवीर तालुक्यातील 12810 अ वर्ग, 217 ब वर्ग तर व्यक्ती सभासद 2 असे 13,029 सभासद पात्र ठरले आहेत.

राधानगरी व करवीर तालुक्यातील एकूण 27,561 सभासद मतदानासाठी पात्र  ठरले आहेत. यानंतर निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती व तेथून पुढे निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. पावसाळ्याच्या तोंडावर व नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेता ही निवडणूक अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण या निवडणुकीसाठी सहकार विभागाकडे सक्षम निवडणूक अधिकारी सध्या नाही, जे अधिकारी आहेत. ते अन्य निवडणूक प्रक्रियेमध्ये अडकले असल्याने महसूल विभागाकडील प्रांत स्तरावरील निवडणूक अधिकारी शोधावा लागणार आहे. त्यामुळे ही निवडणूक सप्टेंबरनंतर होण्याची दाट शक्यता आहे. सध्या निवडणूक कार्यक्रम जाहीर करुन उर्वरित निवडणूक प्रक्रिया सप्टेंबरमध्ये पार पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news