Dr Jaysingrao Pawar | डॉ. जयसिंगराव पवार यांना अखेरचा निरोप

फुलांनी सजविलेल्या स्वर्गरथातून निघाली अंत्ययात्रा
final-farewell-to-dr-jaisingrao-pawar
कोल्हापूर : डॉ. जयसिंगराव पवार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करताना खा. शाहू महाराज व दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव.
Published on
Updated on

कोल्हापूर : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना जनसमुदायाने साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. पंचगंगा स्मशानभूमीत शासकीय इतमामात डॉ. पवार यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी, डॉ. पवार यांच्या पार्थिवावर खा. शाहू महाराज व दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

कोल्हापूर : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कोल्हापूर : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (छाया : मिलन मकानदार)

अंत्ययात्रा व अंत्यसंस्कारावेळी माजी खासदार संजय मंडलिक, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. दिगंबर शिर्के, उपमहापौर अक्षय जरग, प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, मधुरिमाराजे, इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव, डॉ. वसंतराव मोरे, इंद्रजित सावंत, डॉ. सदानंद कदम, उमाकांत राणिंगा, व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, वसंतराव मुळीक, बबनराव रानगे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, कॉ. दिलीप पवार, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, अ‍ॅड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, उमेश पोवार, अ‍ॅड अभिषेक मिठारी, ऋतुराज इंगळे, बाळ पाटणकर, निलराजे पंडित-बावडेकर, उदय गायकवाड, नगरसेवक विनायक फाळके, संजय सावंत, शारंगधर देशमुख, विजयसिंह देसाई, इंद्रजित बोंद्रे, राहुल माने, प्रताप जाधव, कॉम—ेड चंद्रकांत यादव, रघुनाथ कांबळे, गिरीश फोंडे, प्रा. जे. के. पवार, नवभारत शिक्षण संस्था सांगलीचे गौतम पाटील, विजय साळोखे-सरदार, पुंडलिक जाधव, डॉ. अमर अडके, डॉ. मेघा पानसरे, पुरालेखाधिकारी गणेश खोडके, फत्तेसिंग सावंत, हेमंत साळोखे, संजय पवार, गणी आजरेकर, शाहीर दिलीप सावंत, शाहीर आझाद नायकवडी, आर्किटेक्ट अभिजित जाधव-कसबेकर, शफीक देसाई, फिरोज खान उस्ताद, दगडू भास्कर, सुनीलकुमार लवटे, डॉ. संदीप पाटील, सीमा पाटील, उमेश सूर्यवंशी, अजेय दळवी, सुधर्म वाझे, विजय देवणे, संभाजीराव जगदाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्था-संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, माजी खासदार राजू शेट्टी व मराठी भाषा संवर्धन चळवळीचे दीपक पोवार यांनी पवार कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

कोल्हापूर : पोलिस दलाने शिस्तबद्ध संचलनासह बंदुकीतून तीन राऊंड फायर करत शासकीय मानवंदना दिली.
कोल्हापूर : पोलिस दलाने शिस्तबद्ध संचलनासह बंदुकीतून तीन राऊंड फायर करत शासकीय मानवंदना दिली. (छाया : मिलन मकानदार)

रविवारी शोकसभा...

डॉ. जयसिंगराव पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय व व्यापक शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. 29 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता राजर्षी शाहू समाधिस्थळ, नर्सरी बाग, टाऊन हॉल येथे ही शोकसभा होणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news