Film corporation election | चित्रपट महामंडळ निवडणुकीत दोन पॅनेलमध्ये रंगणार अटीतटीची लढत

चिन्हामुळे आता प्रचाराला वेग : 14 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात
Film corporation election |
Film corporation election | चित्रपट महामंडळ निवडणुकीत दोन पॅनेलमध्ये रंगणार अटीतटीची लढत
Published on
Updated on

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनेल व चित्रकर्मी पॅनेल या दोन प्रमुख पॅनेलमध्ये थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. 3 उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित 14 जागांसाठी आता 44 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मावळते अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी ‘समर्थ पॅनेल’ आणि माजी संचालक सतीश रणदिवे यांनी ‘चित्रकर्मी पॅनेल’. घोषित केले आहेत. दोन्ही पॅनेलचे प्रत्येकी 14 उमेदवार निवडणूक लढवत असून, 16 अपक्ष उमेदवारांनीही मैदानात उडी घेतल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. शुक्रवारी गायन समाज देवल क्लबच्या भांडारकर सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी रागिणी खडके यांच्या उपस्थितीत चिन्हांचे वाटप करण्यात आले. समर्थ पॅनेलला ‘पतंग’, तर चित्रकर्मी पॅनेलला ‘कपबशी’ हे चिन्ह देण्यात आले. उर्वरित अपक्ष उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार आणि उपलब्धतेनुसार चिन्हांचे वाटप केले. या निवडणुकीकडे आता ‘कोल्हापूर विरुद्ध पुणे-मुंबई’ असा राजकीय आणि प्रादेशिक रंग चढू लागला आहे.

8 अपक्षांची ‘तिसरी आघाडी’ चित्रपट महामंडळाच्या मैदानात

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात आता तिसर्‍या आघाडीची एन्ट्री झाली आहे. विद्यमान सत्ताधारी गट आणि विरोधी पॅनेल यांच्याविरोधात 8 अपक्ष उमेदवारांनी एकत्र येत ‘महामंडळ बचाव अपक्ष संघ’ स्थापन केला असून, निवडणुकीच्या रिंगणात थेट आव्हान उभे केले आहे. न्यायालयीन वाद, भ—ष्टाचाराचे आरोप आणि राजकीय हस्तक्षेपामुळे महामंडळाची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप करत ‘राजकारणमुक्त आणि पारदर्शक महामंडळ’ उभारण्याचा निर्धार या आघाडीने व्यक्त केला. ‘गेल्या दहा वर्षांत सभासदांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले. कलाकारांच्या मूलभूत समस्या प्रलंबित राहिल्या. त्यामुळे पर्याय म्हणून आम्ही निवडणुकीत उतरत आहोत,’ असे रिंगणातील अपक्ष उमेदवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news