kolhapur : मुलांची मारामारी सोडविताना जमिनीवर पडून वडिलांचा मृत्यू

लक्षतीर्थ वसाहत येथील घटना; दोघे ताब्यात
Father dies after falling to the ground while resolving children's fight
मीरअहमद मुल्लाPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : नातवांच्या वादातून दोन मुलांमध्ये सुरू झालेली मारामारी सोडविताना वृद्ध वडिलांना जीवाला मुकावे लागले. मुलांच्या झटापटीत जोराचा धक्का लागून जमिनीवर पडून प्रकृती अत्यवस्थ बनलेल्या मीरअहमद अब्बास मुल्ला (वय 75, रा. सुतार मळा, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुलाब मीरअहमद मुल्ला (वय 45), फिरोज मीरअहमद मुल्ला (30) यांना ताब्यात घेतले आहे. शनिवारी मध्यरात्री राहत्या घरी हा प्रकार घडला.

मीरअहमद मुल्ला पत्नी रुक्साना, तीन मुले, दोन सुना व नातवंडांसमवेत राहतात. त्यांचा मोठा मुलगा गुलाब अविवाहित असून तो पेंटरचे काम करतो. दुसरा मुलगा जावेद रोजंदारी करतो. लहान मुलगा फिरोज चित्रपट निर्मिती क्षेत्रात सहायक दिग्दर्शक आहे.

मीरअहमद मुल्ला हे शहरात एका चित्रपटगृहात तिकीट बुकिंग मॅनेजर होते. शनिवारी (दि. 24) रात्री उशिरा घरात नातवंडे खेळत असताना त्यांच्यात वादावादी-आरडाओरड झाली. संतापलेला गुलाब मुलांच्या अंगावर धावून गेला. त्यातून गुलाब आणि फिरोज या भावांमध्ये वादावादी सुरू झाली. प्रकरण हातघाईवर आले. दोघांनीही एकमेकाला ठोसे लगावले. प्रकरण आवाक्याबाहेर जात असल्याचे लक्षात येताच वडील मीरअहमद आणि त्यांची पत्नी रुक्साना दोघांत सुरू असलेली मारामारी सोडविण्यासाठी पुढे आले.

यावेळी झालेल्या झटापटीत मीरअहमद यांना जोरात धक्का बसला. जमिनीवर जोरात पडल्यामुळे डोक्याला इजा झाली. पत्नी रुक्साना व मुलांनी त्यांना पाणी देऊन झोपविले. काही वेळानंतर ते बेशुद्ध झाले. प्रकृती अत्यवस्थ बनल्याच कुटुंबीयांनी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घाषित केले.

नातेवाईकांसह नागरिकांची रुग्णालयात गर्दी

मीरअहमद यांचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांसह नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कण्हेरकर, पोलिस उपनिरीक्षक खंडू गायकवाड, हवालदार संजय कोळी यांनी घटनास्थळाची पाहणी करून माहिती घेतली. मुलगा गुलाब आणि फिरोज या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news