Molestation case: मुलीचा विनयभंग; वडिलावर गुन्हा दाखल

कागल तालुक्यातील एका गावात अठरा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी वडिलावर गुन्हा दाखल करण्यात आला
Molestation Case
Molestation CasePudhari
Published on
Updated on

सिद्धनेर्ली : कागल तालुक्यातील एका गावात अठरा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी वडिलावर गुन्हा दाखल करण्यात आला. नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत असून, पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर कागल पोलिसांनी पीडितेच्या वडिलाना ताब्यात घेतले आहे.

पाठ दुखत असल्याचे निमित्त करून मुलीला मलम लावण्यासाठी आपल्या खोलीत बोलावून घेतले व तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने मुलीला मारहाण करत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. कोणाला सांगितले तर स्वतःला संपवून घेईन, अशी धमकी देऊन त्याने पीडितेला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर पीडित मुलीने कागल पोलिस ठाण्यात पित्याविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वैभव जमादार करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news