Sugarcane Season 2026 | केवळ १२७ साखर कारखान्यांची धुराडी पेटली

कोल्हापूर विभागातील १४, तर सोलापूर विभागातील २७ कारखान्यांत ऊस गाळप सुरू
Sugarcane Season 2026 |
Sugarcane Season 2026 | केवळ १२७ साखर कारखान्यांची धुराडी पेटली
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे चालू ऊस हंगामात राज्यातील एकूण २२४ साखर कारखान्यांपैकी २ नोव्हेंबर २०२६ अखेर केवळ १२७ कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. यामध्ये ६२ सहकारी आणि ६५ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. अद्याप ९७ कारखान्यांचे गाळप सुरू झालेले नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामाच्या प्रारंभीच साखर उद्योगासमोर आव्हान उभे राहिले आहे.

साखर आयुक्तालयाच्या २ नोव्हेंबरअखेरच्या अहवालानुसार, राज्यात आतापर्यंत १ लाख १८ हजार ४५० मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून १० लाख ५४ हजार ८०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

साखरेची संभाव्य टंचाई आणि दिवाळीसारख्‍या सणासुदीच्या काळातील वाढत्या मागणीचा अंदाज घेऊन मंत्री समितीच्या बैठकीत परवानाधारक कारखान्यांना आवश्यकतेनुसार १५ ऑक्टोबरपूर्वीही गाळप सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यात स्वभिमानीसह विविध शेतकरी संघटनांनी पहिल्या उचलीसाठी कारखाना बंद आंदोलन सुरू केले आहे. अजून दराचा तोडगा निघालेला नाही. परिणामी, पश्‍चिम महाराष्‍ट्रात हंगामाला गती घेतलेली नाही.

विभागनिहाय सुरू कारखाने आणि कंसात एकूण साखर कारखाने कोल्हापूर १४ (४१), पुणे २४ (२६), सोलापूर २७ (५०), अहिल्यानगर २० (२३), छत्रपती संभाजीनगर १४ (४१), नांदेड २६ (२७), अमरावती २ (११), नागपूर ० (५).

दुष्‍काळामुळे पाणीटंचाई आहे. यामुळे गाळप हंगामाला वेग घेणे अपेक्षित आहे. हंगाम लांबला तर उसाच्या उत्पादनावरही परिणाम होण्‍याची शक्यता आहे.

विजय औताडे, साखर उद्योगातील अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.