

बांबवडे पुढारी वृत्तसेवा: शाहुवाडी तालुक्यातील नांदरी येथील शेतकरी आकाराम लक्ष्मण पाटील हा आपल्या खैराटचे शेत येथे गव्यांपासून पिकांची राखण करण्यासाठी जात होते. ते चालत जात अचानक विहिरीलगतच्या शेताजवळ असलेल्या रानगव्याने त्यांना पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की आकाराम पाटील विहिरीत जाऊन पडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. सकाळी ग्रामस्थांच्या ही गोष्ट लक्षात आली.
शनिवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. सकाळी घटनास्थळी नांदारी ग्रामस्थांची गर्दी झाली होती या घटनेमुळे गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी रानगव्याच्या पायाचे ठसे उमटलेले आहेत. घटनेची माहिती कळताच वनविभागाचे वनपाल एन. ए. जासूद, वनरक्षक अतुल, कदम काजल गावडे, चिमाजी पाटील राजाराम काटकर तसेच सरपंच गौरी कांबळे ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील शांताराम पाटील, सुनील कांबळे, उपसरपंच, पोलीस पाटील व पदाधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. वनविभाग तसेच आरोग्य विभाग मलकापूर यांना माहिती देऊन यासंदर्भात पाहणी करण्यास सांगितले आहे उत्तरीय तपासणीसाठी मृत शेतकरी आकाराम पाटील यांना मलकापूर आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे.