Gaur Attack Farmer Injured | गव्याच्या हल्ल्यातील जखमी शेतकऱ्याचा मृत्यू

Gaur Attack Farmer Injured |
Gaur Attack Farmer Injured | गव्याच्या हल्ल्यातील जखमी शेतकऱ्याचा मृत्यू
Published on: 
Updated on: 

शिरोली दुमाला : करवीर तालुक्यातील मल्लेवाडी येथे गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजाराम शंकर कलिकते (वय ६०) यांचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे मल्लेवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मंगळवारी सकाळी गव्याने शेतात राजाराम कलिकते यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती. दुपारी दोनच्या सुमारास डोंगर परिसरात गवत कापण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना विव्हळण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता कलिकते गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. तातडीने त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे मल्लेवाडीसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीकामासाठी डोंगर परिसरात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.