

सोहाळे : सचिन कळेकर
बकरी चराण्याकरिता गेलेल्या शेकऱ्यावर गव्यांनी हल्ला केल्याची घटना आज (सोमवार) (दि.७) सकाळी आजरा तालुक्यातील सोहाळे येथे घडली. यामध्ये चंदकांत भिकू कोंडूसकर (वय ४८, रा. सोहाळे बाची) यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असून, गव्यांच्या या हल्ल्त्याने सोहाळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, वाची येथील चंद्रकांत कोंडूसकर हे शेतकरी नेहमीप्रमाणे सकाळी गावालगतच असलेल्या खडक नावाच्या शेताकडे बकरी चारण्याकरिता गेले होते. दरम्यान सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास कोंडूसकर यांच्यावर झुडपाआढ असलेल्या गव्याने अचानक हल्ला केला. सुरुवातीला एका गव्याने पाठीमागून हल्ला केला. त्यानंतर दुसऱ्या गव्यानेही हल्ला केला. यामध्ये कोंडूसकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान कोंडूसकर यांच्यावर ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून गडहिंग्लज येथील खासगी दवाखान्यात त्यांना पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.