

सरवडे : सोळांकूर (ता. राधानगरी) येथील विठ्ठल कृष्णा तांबेकर (वय 52) हे वैरणीचा भारा घेऊन येत असताना बांधावरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली आहे.
विठ्ठल हे फोडाला नावाच्या शेतात वैरणीसाठी गेले होते. बांधावरून भारा घेऊन येत असताना पाय घसरल्यामुळे वैरणीचा भारा त्यांच्या मानेवर पडल्याने ते शेतात बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यांचा सोळांकूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. विठ्ठल यांच्या मज्जातंतूवर जोरदार मार लागला होता, अशी फिर्याद दयानंद तोरस्कर यांनी दिली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.