

Shirol Shirdhon Farmer Assault
कुरुंदवाड : शेतातील भाजीपाल्याचे नुकसान करणाऱ्या घोड्यांबाबत जाब विचारल्याचा राग मनात धरून एका शेतकऱ्यावर लाकडी काठीने हल्ला करून मारहाण केल्याची घटना शिरढोण (ता. शिरोळ) येथे घडली. याप्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरढोण येथील अमोल छत्तर चौधरी (वय ४२) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार युवराज अशोक यादव (रा. शिरढोण) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शेतकरी चौधरी यांनी यादव यांना त्यांच्या घोड्याने भाजीपाल्याचे नुकसान केल्याचा जाब विचारला याचा राग आल्याने यादव यांनी शिवीगाळ करत चौधरी यांच्यावर धावून जाऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लाकडी काठीने मारहाण करून दुखापत केल्याचा फिर्यादीत म्हटले आहे.