Accident Death | प्रसिद्ध ट्रक मेस्त्री बाबुराव लोहार यांचा अपघाती मृत्यू

Accident Death |
Accident Death | प्रसिद्ध ट्रक मेस्त्री बाबुराव लोहार यांचा अपघाती मृत्यू
Published on
Updated on

कोल्हापूर : ट्रकच्या बॉडी तयार करणे आणि दुरुस्तीमध्ये प्रसिद्ध असणारे मेस्त्री बाबुराव आप्पाजी लोहार (वय ७३, रा. जिवबा नाना पार्क, ता. करवीर) यांचा सोमवारी सकाळी अपघाती मृत्यू झाला. अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन सकाळी ६ वाजता घरी परतत असताना रंकाळा येथील खराडे महाविद्यालयासमोर हा अपघात झाला. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली असून, नेमका अपघात कसा झाला याचा शोध पोलिस घेत आहेत.

बाबुराव लोहार यांचे जिवबा नाना जाधव पार्क परिसरात ट्रक बॉडी तयार करण्याचे गॅरेज आहे. ते परिवारासह गॅरेजच्या पिछाडीस असणाऱ्या बंगल्यात राहतात. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते मोटारीतून अंबाबाई दर्शनासाठी गेले होते. तिथून बाबुजमाल दर्गा येथे दर्शन घेऊन रंकाळा टॉवरमार्गे ते घरी निघाले होते. खराडे महाविद्यालयासमोर त्यांच्या मोटारीचा गंभीर अपघात झाला. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना नागरिकांनी तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे.

मोठा आवाज झाला...

बाबुराव लोहार यांच्या मोटारीच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. मात्र घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी अथवा सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे नेमका अपघात कसा झाला, हे समजू शकले नाही. एका महिलेने पोलिसांना साडेपाच वाजण्याच्या सुमारास मोठा आवाज झाल्याचे सांगितले.

१०८ ॲम्ब्युॅलन्सने सीपीआरमध्ये

अपघातानंतर लोहार यांना १०८ ॲम्ब्युलन्सने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. सीपीआरमधील काही नागरिकांना लोहार यांची ओळख पटल्यामुळे त्यांनी याची माहिती कुटुंबीयांना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news