Fake liquor smuggling | भाताच्या कोंड्याच्या पोत्यातून गोवा बनावट दारूची तस्करी

(छाया : नाज ट्रेनर)
कोल्हापूर : गोवा बनावट दारूची तस्करी करणार्‍या आंतरराज्य तस्करांना बेड्या ठोकून दारूसाठा हस्तगत करण्यात आला आहे.
Published on
Updated on

कोल्हापूर : भाताच्या कोंड्याच्या पोत्यातून गोवा बनावट दारूची तस्करी करणार्‍या आंतरराज्य तस्करांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या. ट्रकचालक भरत सुखराम गुरूंग (वय 33, रा. सुखराम डाली, जि. सिमला चिरगाव, हिमाचल), क्लीनर सुनीलकुमार प्रेमसिंह ठाकूर (32, कंद्रोरा, खंग्तरी, जि. सिमला, हिमाचल) अशी त्यांची नावे आहेत.

संशयिताकडून 97 लाखांची विदेशी दारू, 22 लाखांचे साहित्य असा 1 कोटी 19 लाख 81 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गारगोटी-कोल्हापूर मार्गावर मौजे हणबरवाडी येथील बारसमोर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक स्नेहलता नरवणे, उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news