Fetal gender diagnosis, abortion case | कसाई जोमात, यंत्रणा कोमात

64 महिन्यांत 35 अड्ड्यांचा पर्दाफाश; तरीही कारनाम्यांची वाढती व्याप्ती, जोरदार कमाईमुळे टोळ्या सक्रिय
Fetal gender diagnosis, abortion case |
Fetal gender diagnosis, abortion case | कसाई जोमात, यंत्रणा कोमात
Published on
Updated on

दिलीप भिसे

कोल्हापूर : स्थानिक प्रशासन अन् कथित कार्यकर्त्यांना हाताशी धरून गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणार्‍या कसाई टोळ्यांनी शहरासह जिल्ह्यात हौदोस घातला आहे. आपसूक मिळणार्‍या जोराच्या कमाईमुळे सराईत टोळ्यांच्या कारनाम्यांची व्याप्तीही वाढू लागली आहे. 2020 पासून आजअखेर म्हणजे 64 महिन्यांत गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणार्‍या जिल्ह्यातील एकूण 35 अड्ड्यांचा पर्दाफाश केला असला तरी गर्भातच कळ्या खुडण्याचे काम बेधडक सुरूच आहेत.

जुजबी कारवाई होत असल्यामुळे या प्रकरणातील सराईतांना यंत्रणेचा धाकच राहिलेला नाही. टोळ्यांना रोखण्यासाठी ‘मोका’ अंतर्गत कारवाईचे शस्त्र हाच, प्रभावी उतारा शक्य आहे. शहर, जिल्ह्यात बेकायदा गर्भलिंग निदान आणि गर्भपातप्रकरणी झालेल्या कारवाईत आजवर 120 पेक्षा जादा संशयिताना पोलिसांनी कोठडीचा रस्ता दाखविला. त्यात वीसपेक्षा अधिक महिला संशयितांचा सहभाग आहे.

धक्कादायक बाब म्हणजे त्यात काही महिला डॉक्टर आणि परिचारिकांचाही समावेश आहे. गर्भपात करण्यासाठी 50 ते 80 रुपयांत गोळ्या मिळतात. मात्र सराईत टोळ्याकडून याच गोळ्यासाठी 30 ते 50 हजार रुपये उकळले जाते, तर गर्भलिंग निदान करण्यासाठी 50 ते 75 हजार रुपये उकळले जाते. मिळकतीचा हा गोरखधंदा सोन्यासारखी कमाई करून देणारा असल्याने अनेक सराईत गुन्हेगारी टोळ्यांचाही शिरकाव होऊ लागला आहे.

2020 ते मार्च 2026 काळात झालेली कारवाई

2020 : कोडोली (पन्हाळा)

2021 : इचलकरंजी, परिते (करवीर)

2023 : आमजाई व्हरवडे, कसबा वाळवे, मडिलगे

2024 : कोल्हापूर शहर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, म्हाडा कॉलनी, बांबवडे, चिखली रोड, वरणगे पाडळी, फुलेवाडी, मडिलगे खुर्द

2024 : परिते-कुरुकली येथे डॉक्टरसह तिघांना अटक

2024 : पन्हाळा, राधानगरी तालुक्यात छापा, आंबेवाडी-चिखली रोडवर छापा

2025 : फुलेवाडी, बुधवार पेठ, जोतिबा डोंगर, गंगावेस येथील औषध विक्रेता गजाआड

2025 : कळंबा येथील रुग्णालय आणि वरणगे पाडळी येथे छापा; महिला डॉक्टरसह तिघींना अटक

फेब्रुवारी 2026 : बालिंगा येथील अड्ड्यावर छापा : सूत्रधार स्वप्निल पाटीलसह सहाजणांना अटक

मार्च 2026 :बिद्री (कागल) अड्ड्यांवर छापा; 12 जणांना अटक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news