

दरवर्षी १६ ऑक्टोबरला साजऱ्या होणाऱ्या जागतिक खाद्य दिनाचा उद्देश भूक, कुपोषण आणि अन्नसुरक्षेविषयी जनजागृती करणे हा आहे. या दिनाच्या निमित्ताने जगभरातील खाद्यसंस्कृतीचा घेतलेला हा वेध... देशोदेशींच्या चींची देवाणघेवाण, बदलती खवय्येगिरी, आरोग्यदायी आहाराचा बाढता कल आणि पारंपरिक पदार्थाना मिळणारे आधुनिक रूप अशा विविध पैलूंमधून उलगडणारी ही खाद्यविश्वाची रंजक सफर!
अनुराधा कदम
खाद्यसंस्कृती म्हणजे केवल मूक मागवण्याचे साधन नरहे। तर ती एखाद्या देशाची ओळख, परंपरा, जीवनशैली आणि संस्कृतीचे प्रतिबिंब असते. पूर्वी आपल्या आवडीचे पदार्थ म्हणजे घरच्या चुलीवर तयार होणारे वरण-भात, भाकरी, पिठलं, भाजी किंवा सणासुदीचे गोडधोड, आज मात्र या पारंपरिक पदार्थांसोबत पिझ्झा, पास्ता, सुशी, टैंकोज, रामेन आणि विविध देशांतील खाहापदार्थांनी आपल्या ताटात सहज प्रवेश केला आहे. दुसरीकडे, पाश्चात्त्य देशांमध्ये भारतीय मसाले, डोसा, बिर्याणी, चहा आणि मिलेट्ससारख्या पौष्टिक पदार्थांबद्दल आकर्षण वाढत आहे. जगभरातील खाहासंस्कृतींची ही देवाणघेवाण केवळ चवीपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर आरोग्य, पर्यावरण, सोय आणि बदलत्या जीवनशैलीशीही जोडली गेली आहे. १६ ऑक्टोबरला साजऱ्या होणाऱ्या जागतिक खाद्य दिनाच्या निमित्ताने या बदलत्या खाद्यविश्वाचा वेध घेणे महत्त्वाचे ठरते. एका ताटात अनेक देशांच्या चवी!
जागतिकीकरण, पर्यटन, स्थलांतर, हटिल व्यवसाय आणि समाजमाध्यमांमुळे जगातील विविध खाद्यसंस्कृती एकमेकांच्या अधिक जवळ आल्या आहेत. इटलीचा पिझ्झा आणि पास्ता मारतात लोकप्रिय झाले, तर भारतीय करी, मलाला डोसा, समोसा आणि बिर्याणीला परदेशातही पसंती मिळत आहे. जपानी सुशी, रामेन, कोरियन किमची, मेक्सिकन टैंकोज, मध्यपूर्वेतील हमस आणि फलफल यांसारखे पदार्थही विविध देशांतील खाहाप्रेमींच्या पसंतीस उत्तरत आहेत.
या देवाणघेवाणीतून फ्युजन फूड अर्थात दोन किंवा अधिक खाद्यसंस्कृतीचा संगम साधणाऱ्या पदार्थांचा नवा प्रकार विकसित झान्ना आहे. भारतीय मसाल्यांचा वापर करून तयार केलेला पास्ता, पनीर टिक्का मिक्षा, तंदूरी मोमोज, मसाला टैंकोज किया भारतीय चळीचा बर्गर ही त्याची उदाहरणे आहेत, पारंपरिवा पदार्थांना आधुनिक रूप देण्याचा हा प्रयत्न तरुण पिढीला विशेष आकर्षित करतो. त्यामुळे आज चावस्यांना केवळ परिचित तत नको, तर काहीतरी वेगळे अनुभवण्याचीही इच्छा असते.
आरोग्यदायी पदार्थाकडे वाढता कल पूर्वी खाद्यपदार्थांची निवड करताना चव, सुगंध, रंग आणि पोटभरपणा यांना प्राधान्य दिले जायचे. आज त्यासोबत पदार्थातील प्रथिने, तंतुमय घटक, साखर, मीठ, चरबी आणि एकूण पौष्टिक मूल्य वांचाही विचार केला जात आहे. व्यायामशाळेत जाणारे तरुण, वजन नियंत्रित ठेवू इच्छिणारे नागरिक आणि आरोग्याबाबत जागरूक कुटुंबे यांच्यात प्रथिनयुक्त पदार्थ, सॅलड, ओटस्, दही, नटस्, बिया आणि फळांचा वापर वाढताना दिसतो, वनस्पतीजन्य आहारालाही जागतिक स्तरावर महत्व मिळत आहे. डाळी, कडधान्ये, सोयाबीन, टोफु, हरभरा आणि विविध धान्यांपासून तयार केलेले पदार्थ मांसाहारात्न पर्याय म्हणून स्वीकारले जात आहेत. मात्र, केवळ एखाद्या पदार्थावर 'हेल्दी' किवा 'प्रोटिनयुक्त्त' असा शिक्का असल्यामुळे तो पूर्णपणे आरोग्यदायी ठरत नाही. त्यातील साकार, मीठ, चरबी आणि प्रक्रिया करण्याची पद्धत यांचाही विचार आवश्यक आहे.
याचबरोबर भारतातील नाचणी, ज्वारी, बाजरी, राळा आणि इतर मखधान्यांना जागतिक बाजारपेठेत नव्याने महाव प्राप्त हेत आहे. या धान्यांपासून तयार होणारे पॅनकेक, कुकीज, लाइ, नाश्त्याचे पदार्थ आणि झटपट तयार होणारे खाद्यपदार्थ आधुनिक ग्राहकांना आकर्षित करतात. पारंपरिक थान्यांना आधुनिक खाद्यपद्धतीशी जोडल्यामुळे स्थानिक शेतकरी आणि अन्नप्रक्रिया उद्योगासाठीही नव्या संधी निर्माण होऊ शकतात. वयोगटानुसार बदलतेय खाद्यपसंती प्रत्येक वयोगटाची खाद्यपसंती वेगळी असते. लहान मुलांना रंगीत, आकर्षक आणि सहज खाता येणारे पदार्थ आवडतात. मात्र, आकर्षक दिसणाऱ्या प्रत्येक पदार्थात पुरेसे पोषण असेलच असे नाही त्यामुळे मुलांच्या आहारात फळे, भाज्या, दूध, कराधान्यये आणि घरगुती पौष्टिक पदार्थांचा समावेश महत्त्वाचा आहे.
किशोरवयीन आणि तरुण पिढीवर समाजमाध्यमांचा प्रभाव अधिक दिसतो. एखाद्या खाद्यपदार्थाचा व्हिडीओ लोकप्रिय झाला की तो चाखण्याची उत्सुकता निर्माण होते. कोरियन नूडल्स, मोची, बाल टी, विविध प्रकारचे पारता आणि नावीन्यपूर्ण मिष्टालांकडे या वयोगटावे आकर्षण आहे. महाविद्यालयीन तरुणांना कमी वेळात मिळणारे, सहज नेता येणारे आणि चवीत वेगळेपणा असलेले पदार्थही आवडतात. नोकरी करणाऱ्या प्रौढांना चव आणि सोयीसोबत आरोग्याचा समतोल साधणारे पर्याय हवे असतात, कार्यालयात नेता येणारे डबे, पौष्टिक सॅलड, धान्यांचे पदार्थ, कमी वेळात तयार होणारे अद्र आणि नियंत्रित प्रमाणातील खाणे यांना महत्व मिळत आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या आहारात मात्र पचनास सुलभ, कमी मीठ-साखर असलेले आणि आवश्यक पोषक घटक देणारे पदार्थ महत्त्वाचे ठरतात. वयानुसार प्रथिने, कॅल्शियम, तंतुमय घटक आणि इतर पोषक घटकांची गरज लक्षात घेऊन आहार निवडणे आवश्यक आहे. अशा प्रकारे एकाच कुटुंबातही प्रत्येकाच्या वयानुसार आणि गरजेनुसार खाद्यपसंती बदलत आहे. सोयीसोबत टिकाऊ खाद्यसंस्कृतीची गरज
खाद्यसंस्कृतीची गरज
धावपळीच्या जीवनात तयार खाद्यपदार्थ, गोठरलेले पदार्थ, 李टपट शिजणारे मिश्रण आणि घरपोच खाद्यासेवा लोकप्रिय होत आहेत. विशेषतः शहरांमध्ये कामाच्या वेळा, प्रचार आणि लहान कुटुंबांमुळे कमी वेळात जेवण तयार करण्याच्या पर्यायांना मागणी आहे. मात्र, सोयीच्या नावाखाली अतिप्रक्रिया केलेले पदार्थ आणि अतिरिक्त साखर, मीठ किंया चरबीयुक्त आवश्यक आहे.
दुसरीकडे, अझाची नासाडी कमी करणे, स्थथानिक आणि हंगामर्मी पदार्थ वापरणे, पर्यावरणपूरक पॅकेजिंग स्वीकारणे आणि शेतकऱ्यांकडून बेट अन्नपदार्थ खरेदी करणे याकडेही लक्ष दिले जात आहे. उरलेल्या अन्नाचा योग्य वापर, आवश्यक तेवढेच अन्न वाढणे आणि धान्ये भाज्यांची साठवण योग्य पद्धतीने करणे ही टिकाऊ खाद्यसंस्कृतीची महत्त्वाची पावले आहेत. चवीचा प्रवास आरोग्यापर्यंत!
जागतिक साय दिन हा केवल विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा दिवस नाही. प्रत्येकाला पुरेसे, सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे, याची जाणीव करून देणात तो दिवस आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने २०२६ साठी 'आज नवनवीन उपाय शोधूया, उद्याचे पोषण करूया' हा संदेश दिला आहे. बदलत्या खाद्यसंस्कृतीच्या पार्श्वभूमीवर या विचाराला विशेष महत्त्व आहे.
आज जगातील खवय्ये एका बाजूला नवनचीन चवींचा शोध घेत आहेत, तर दुसरीकडे आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक आहाराकडे वळत आहेत. पिझ्झा असो या पुरणपोळी, सुशी असो वा ज्यारीची भाकरी; पदार्थ कोणताही असला तरी त्यातील गुणवत्ता, पौष्टिकता आणि योग्य प्रमाण महत्वाचे आहे. जागतिक खाद्यसंस्कृतीची खरी समृद्धी ही एका देशाची चय दुसऱ्या देशापर्यंत पोहोचण्यातच नाही, तर परंपरेचा सन्मान राखत आरोगादायी भविष्य घडवण्यात आहे. कारण खाद्यपदार्थाची चव जिभेला आनंद देते; पण योग्य आहार शरीराला ऊर्जा, मनाला प्रसव्रता आणि जीवनाला निरोगी दिशा देतो.