kolhapur Crime News | जयसिंगपुरात माजी सैनिकांवर लाठीहल्ला, राष्ट्रध्वजाचा अपमान; सहा जणांवर गुन्हा

kolhapur Crime News |
kolhapur Crime News | जयसिंगपुरात माजी सैनिकांवर लाठीहल्ला, राष्ट्रध्वजाचा अपमान; सहा जणांवर गुन्हाFile Photo
Published on
Updated on

जयसिंगपूर : येथील सिद्धेश्वर मंदिराबाहेर रविवारी सायंकाळी माजी सैनिकांना काठी व हाताने मारहाण करण्यात आली. तसेच चारचाकीवर लावलेला राष्ट्रध्वज काढून त्याचा अवमान केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद माजी सैनिक अमरकुमार पाटील यांनी दिली आहे.

याप्रकरणी धीरज धन्यकुमार पाराज (रा. दानोळी), गणेश चौगुले, चेतन शिकलगार, रवी पवार, राहुल पाटील आणि आमदार यांचा खासगी सुरक्षारक्षक अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास अमरकुमार पाटील हे दीपक कृष्णा पाटील, रिटायर्ड कॅप्टन प्रकाश तुकाराम खोत, सेवानिवृत्त लेफ्टनंट विजय मारुती गायकवाड, विजय यशवंत पाटील, विनोद सुरेश पाटील, अमर वसंत पाटील यांच्यासह माजी सैनिक श्री सिद्धेश्वर मंदिराबाहेर आल्यानंतर वरील संशयितांनी मारहाण केली.

यादरम्यान, संशयितानेे विजय यशवंत पाटील यांच्या चारचाकी गाडीवर लावलेला राष्ट्रध्वज काढून त्याचा अवमान केला. तसेच त्याच काठीने फिर्यादी अमरकुमार पाटील व दीपक पाटील यांना मारहाण केली. संशयितांनी गाडीवर काठीने मारून सुमारे ३,००० रुपयांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news