

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा
अकीवाट ता.शिरोळ येथे शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आणि केळीच्या बागेत जाण्यासाठी निघालेला ट्रॅक्टर पलटी झाला. महापुरात वाहून गेलेल्या दोघांपैकी माजी सरपंच आण्णासाहेब सुरेंद्र हसुरे (वय.55) यांचा मृतदेह शनिवारी मिळून आला, तर माजी जि.प सदस्य इकबाल बैरगदार यांची रविवारी सायंकाळीपर्यंत शोध मोहीम सुरू होती. आज चौथ्या दिवशी ड्रोनद्वारे शोध मोहीम सुरू आहे.
अकिवाट येथील महापुरात ट्रॅक्टर पलटी होऊन घडलेल्या घटनेला रविवारी तीन दिवस झाले. पहिल्या दिवशी सुहास पाटील यांचा मृत्यू झाला, तर शनिवारी दुसऱ्या दिवशी आण्णासाहेब हसुरे यांचा मृतदेह वजीर रेस्क्यू फोर्सने शोधून काढला तर बैरागदार यांच्या शोधासाठी पास रेस्क्यू फोर्सने ड्रोनद्वारे शोध मोहीम यंत्रणा गतिमान केली आहे. पास रेस्क्यू, वजीर रेस्क्यू, व्हाईट आर्मी आणि एन.डी. आर.एफ पथकातर्फे शोध मोहीम सुरू आहे.
यांत्रिक बोट आणि ड्रोनद्वारे कर्नाटक राज्यापर्यंत शोधमोहीम करण्यात येणार असल्याचे पास फोर्सच्या जवानांनी सांगितले.