Kolhapur ZP Election | बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी ईव्हीएम जमिनीवर आपटले ; भुदरगडमधील मतदान केंद्रावर तणाव

Bhudargad Election News | भुदरगड तालुक्यात नाधवडे येथील मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाचे वातावरण
Bhudargad Voting Center EVM smashed
जयवंत वायदंडे Pudhari
Published on
Updated on

Bhudargad Voting Center EVM smashed

गारगोटी : भुदरगड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असतानाच नाधवडे येथील एका मतदान केंद्रावर ईव्हीएम जमिनीवर आपटून निषेध व्यक्त करण्यात आला. ही घटना आज (दि.७) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या ग्राहक सेनेचे जिल्हाप्रमुख जयवंत वायदंडे यांनी मतदान केल्यानंतर ईव्हीएम मशीन जमिनीवर आपटून निवडणूक आयोगासह शासन व निवडणूक विभागाचा निषेध व्यक्त केला. या प्रकारामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Bhudargad Voting Center EVM smashed
Kolhapur ZP Election | सावे येथील १०५ वर्षे वयाच्या आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क

जयवंत वायदंडे यांनी अचानक केलेल्या या कृतीमुळे मतदान केंद्रावर उपस्थित मतदारांमध्ये गोंधळ उडाला आणि काही काळ मतदान प्रक्रिया ठप्प झाली. मतदान केंद्रावर असलेल्या कर्मचारी व मतदारांमध्ये क्षणिक तणाव निर्माण झाला होता.

घटनेची माहिती मिळताच बंदोबस्तावर असलेले पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक योगेश गोरे यांनी संबंधित व्यक्तीस ताब्यात घेतले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर काही वेळातच मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आली.

Bhudargad Voting Center EVM smashed
Kolhapur ZP Election | वय विसरले, कर्तव्य स्मरले ! शाहूवाडीत ९५ वर्षांच्या आजी -आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क

दरम्यान, निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हरेश सुळ यांनी दिली. अशा प्रकारच्या कृतीमुळे निवडणूक प्रक्रियेची पवित्रता धोक्यात येत असल्याने दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news