Kolhapur News | जिल्ह्यातील आस्थापनांनी ऑनलाईन नोंदणी करावी : ‌‘ईपीएफओ‌’चे आवाहन

भारतीय भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नवीन कंपनी आणि आस्थापनांना तत्काळ ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केले
Kolhapur News |
EPFOPudhari Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : भारतीय भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नवीन कंपनी आणि आस्थापनांना तत्काळ ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. ही नोंदणी श्रम सुविधा पोर्टलवरील जपश्रळपश ठशसळीीींरींळेप षेी एाश्रूेिशीी (जङठए) या पर्यायाद्वारे सोप्या पद्धतीने करता येते. नोंदणी न केल्यास आगामी योजनांचा लाभ मिळणार नसल्याचेही ईपीएफओने स्पष्ट केले आहे.

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेंतर्गत नवीन कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात कर्मचारी व नियोक्त्याच्या मिळून येणाऱ्या 12 टक्के योगदानाची रक्कम सरकारकडून चार वर्षे जमा करण्यात येणार आहे. यासाठी नोंदणी कालावधी 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 पर्यंत असणार आहे. अधिक माहितीसाठी प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news