

उचगाव : पुणे-बंगळूर महामार्गावर उचगाव येथे टीव्हीएस कंपनीच्या इलेक्ट्रिक आयक्यूब दुचाकीला अचानक आग लागून ती भस्मसात झाली. घटनास्थळी यावेळी एकच गर्दी झाली.
या दुचाकीवरून महामार्गावरून निवास यमगर (रा. उचगाव) जात होते. दुचाकीमध्ये काहीतरी बिघाड झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खाली उतरून दुचाकीची पाहणी केली. त्यावेळी त्यांना दुचाकी जळत असल्याची खात्री झाली. त्यांनी ताबडतोब दुचाकीमधील महत्त्वाची कागदपत्रे व साहित्य काढून घेतले. याचदरम्यान दुचाकीने जोरदार पेट घेतला. बघता बघता दुचाकी जळून खाक झाली. अगिनशमन दलाची गाडीही दाखल झाली; पण तत्पूर्वीच दुचाकी भस्मसात झाली होती. याबाबत गांधीनगर पोलिस ठाण्यास जमलेल्या लोकांनी माहिती दिली.