kolhapur : महापालिका निवडणुकीत हिशेब होणार चुकते !

सत्तासंघर्षात डाव जुनेच, राजकारण मात्र नवे!
election preparations political parties active again
kolhapur : महापालिका निवडणुकीत हिशेब होणार चुकते !Pudhari File Photo
Published on
Updated on
डॅनियल काळे

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय कार्यकर्ते जुने हिशेब चुकता करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे. गेल्या पाच वर्षांपासून ही निवडणूक होण्याची प्रतीक्षा होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान वरिष्ठ नेत्यांनी परस्पर सहकार्याचे आश्वासन दिले होते. आता या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय डाव जुनेच असतील, राजकारण मात्र नवे असेल.

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पडलेली उभी फूट, महायुतीचे बदललेले समीकरण आणि काँग्रेसमधील अंतर्गत हालचाली यामुळे राजकारण अधिकच रंगतदार झाले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात सत्तेची सूत्रे आपल्या हाती ठेवण्यासाठी प्रत्येक गट सक्रिय झाला आहे. पूर्वी अपक्ष उमेदवारांवर आधारित असलेली महापालिका आता पक्षीय राजकारणात गुंतली आहे. गेल्या 15 वर्षांपासून सत्तेचा झेंडा काँग्रेसने फडकवला आहे. आमदार सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे.

महाडिक गटाने पुन्हा मुसंडी मारण्यासाठी भाजपच्या मदतीने मोर्चेबांधणी केली आहे. धनंजय महाडिक राज्यसभा खासदार, तर अमल महाडिक भाजपचे आमदार असून मंत्री चंद्रकांत पाटील यांचाही त्यांना पाठिंबा आहे. शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर आणि अजित पवार गटातील नगरसेवकांना सोबत घेऊन महायुती महापालिकेवर भगवा झेंडा फडकवू इच्छित आहे. दरम्यान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पुन्हा महापालिकेवर आपली पकड राखण्यासाठी ते नवे सहकारी शोधत आहेत. हाच एक हिशेब चुकता करून विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढून हिशेब चुकता करण्याच्या तयारीत काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत.

राजकीय वारे पाहून इच्छुकांचा पक्षप्रवेश

राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहते हे पाहून इच्छुक उमेदवार निर्णय घेत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या बाजूने वाहणारे वारे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होताच पुन्हा महायुतीच्या दिशेने वाहू लागले. त्यामुळे काही इच्छुक मंडळी गोंधळली आहेत. राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहते हे पाहून पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय ते घेणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news