election officials to verify EVM in kolhapur north, chandgad
कोल्हापूर उत्तर, चंदगडमधील इव्हीएमची पडताळणी होणारFile Photo

EVM Verification | कोल्हापूर उत्तर, चंदगडमधील इव्हीएमची पडताळणी होणार

दि. 23 ते 26 या कालावधीत मागणी केलेल्या दहा मतदान केंद्रांवरील यंत्रांचा समावेश
Published on

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर आणि चंदगड मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालेल्या एकूण दहा मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रांची पडताळणी होणार आहे. दि.23 ते दि.26 या कालावधीत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.

कोल्हापूर उत्तर आणि चंदगड विधानसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवर पराभूत उमेदवारांनी मिळालेल्या मतदानावर साशंकता व्यक्त करत चुकीच्या पद्धतीने मतमोजणी झाल्याचा आक्षेप घेतला होता. या मतदान केंद्रांवरील इव्हीएमची फेरमतमोजणी करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, ती मागणी फेटाळत निवडणूक आयोगाने मतमोजणीच्या ऐवजी त्या मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रांची पडताळणी करण्याबाबत निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार या दोन्ही मतदार संघातील प्रत्येकी पाच मतदान केंद्रांवरील इव्हीएमची पडताळणी होणार आहे. या इव्हीएमवर प्रत्येकी 1400 मते टाकली जाणार आहेत. त्यानुसार टाकलेल्या मताप्रमाणेच त्या यंत्रांवर मतदान होते की नाही, हे तपासले जाणार आहे. यानंतर व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजल्या जाणार आहेत. याकरिता संबंधित उमेदवार आणि त्यांच्या एका प्रतिनिधीला प्रवेश दिला जाणार आहे. दररोज तीन इव्हीएमची पडताळणी केली जाणार आहे. एका इव्हीएमच्या पडताळणीसाठी सात ते आठ तासांचाही कालावधी लागण्याची शक्यता आहे. याकरिता चार अभियंत्यांचीही नियुक्ती केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news