

गुडाळ: खिंडी व्हरवडे (ता. राधानगरी) येथील महादेव नागू सावंत (वय 84) हे वृद्ध बुधवारी (दि.८) दुपारपासून बेपत्ता झाले आहेत. खिंडी व्हरवडेचे माजी उपसरपंचाचे वडील असलेले महादेव सावंत बुधवारी दुपारी एकच्या सुमारास आकनुर रोडवर असलेल्या खिंडीचा माळ या शेतात जाऊन येतो म्हणून घरातून गेले होते.
बुधवारी (दि.८) सायंकाळपर्यंत ते परत न आल्याने घरच्या मंडळींनी आणि ग्रामस्थांनी खिंडीचा माळ परिसरात सर्वत्र शोधाशोध केली मात्र सावंत आढळून आले नाहीत. घरातून जाताना त्यांनी त्यांच्या कपाटातून दहा- बारा हजारांची रोकड सोबत नेली असल्याचे चित्र देखील रात्री स्पष्ट झाले.
सावंत यांच्या अंगावर तीन बटनाचा फिकट निळसर शर्ट , डोक्यावर गांधी टोपी आणि खाकी चड्डी असा त्यांचा पेहराव आहे. त्यांच्या हातात काठी असून त्यांना श्रवणदोषामुळे कमी ऐकू येते. अशा वर्णनाची व्यक्ती कोणाला आढळल्यास, धनाजी सावंत किंवा राधानगरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.