Balinga Murder Case | बालिंगा येथे वृद्ध गवंड्याचा धारदार शस्त्राने खून

मृत मूळचा खानापूर-बेळगाव येथील; मृतदेह आढळला सडलेल्या अवस्थेत
Balinga Murder Case |
Balinga Murder Case | बालिंगा येथे वृद्ध गवंड्याचा धारदार शस्त्राने खून
Published on: 
Updated on: 

बालिंगा : बालिंगा (ता. करवीर) येथे महादेव रामू गवसेकर (वय ६५, रा. खानापूर, जि. बेळगाव) या गवंडी कामगाराचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. शनिवारी ही घटना घडल्याचा संशय असून दुर्गंधी पसरल्यावर सोमवारी हा प्रकार उघडकीस आला.

बालिंगा येथे वसंत ढेंगे यांच्‍या घरात कल्लाप्पा मळवकर (मूळ रा. मोदेकोप, ता. खानापूर, जि. बेळगाव) हे मुकादम भाडेकरू म्हणून राहतात. त्यांच्यासोबत महादेव रामू गवसेकर, सुरेश (पूर्ण नाव समजलेले नाही) व अन्य दोघे राहतात. हे सर्वजण बालिंगा, नागदेववाडी येथे फिटिंग व गवंडी काम करत होते. सोमवारी दुर्गंधीच्‍या माहितीनंतर पोलिसांनी पाहणी केल्‍यावर संबंधित खोलीचा दरवाजा उघडा दिसला. घरात सडलेल्या अवस्थेत गवसेकर यांचा मृतदेह होता. गळ्यावर धारदार शस्त्राने वार केलेले होते. झोपेतच गवसेकर यांच्यावर हल्ला झाल्‍याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. हा खून पैशाच्या देवघेवीतून झाल्‍याची शक्यता व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news