Kolhapur Gadhinglaj accident news |
गडहिंग्लज : मॉर्निंग वॉकला गेलेल्या शरद बाबुराव गोडसे (वय ७८, घाळी कॉलनी, गडहिंग्लज) या वृद्धाला भरधाव वेगाने आलेल्या कारने पाठीमागून जोराची धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
गोडसे हे नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गिजवणे रस्त्यावर गेले होते. सकाळी साडेसहाच्या सुमारास गडहिंग्लजवरून आजराकडे जाणाऱ्या इग्निस (टीएस ०८ एचएच ५७१८) या चारचाकीने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की गोडसे यांचा जागेवरच मृत्यू झाला. चारचाकी लगत असलेल्या ओढ्याच्या संरक्षक भिंतीला जाऊन धडकली. यामध्ये गाडीतील प्रवाशीही किरकोळ जखमी झाले.