Land Dispute Assault | शेतीच्या वादातून मारहाण; उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू

चांदेकरवाडीत भावकीतील वादाचे हिंसक रूप; तिघांना अटक
Agricultural Land Dispute |
Agricultural Land Dispute | शेतीच्या वादातून मारहाण; उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू
Published on: 
Updated on: 

राधानगरी/राशिवडे : चांदेकरवाडी (ता. राधानगरी) येथे भावकीमध्ये शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत यशवंत गोपाळ खोत (वय ६८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजी महादेव खोत (वय ५०), रितेश शिवाजी खोत (वय २३) व वैशाली शिवाजी खोत (वय ४०, सर्व रा. चांदेकरवाडी) यांना राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

फिर्यादी सचिन यशवंत खोत यांनी वडील यशवंत महादेव खोत यांना दुकानातून टूथपेस्ट आणण्यासाठी फोन केला असता फोनवरून भांडणाचा आवाज ऐकू आला. यावेळी ते त्याठिकाणी गेले असता शिवाजी खोत, रितेश खोत व वैशाली खोत हे तिघेजण वडील यशवंत यांना खाली पाडून काठ्यांनी पाठीवर, डोक्यावर, हातावर मारहाण करत होते. जखमी यशवंत यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शहापुरात सुगंधी सुपारी, तंबाखूचा साठा जप्त

यड्राव : शहापूर येथे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व सुगंधित सुपारी विक्री करणार्‍या दुकानावर शहापूर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यामध्ये सुमारे एक लाख ६४ हजार ९१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संतोष शिवाजी गावकर (वय ३५, रा. दत्तनगर, शहापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.