Dengue outbreak risk | ‘अल निनो’मुळे आता ‘डेंग्यू’च्या डंखांचाही ताप वाढणार!

उष्णता, अनियमित पाऊस, दमट हवामानात एडिस एजिप्ती डासांची पैदास
Dengue outbreak risk |
Dengue outbreak risk | ‘अल निनो’मुळे आता ‘डेंग्यू’च्या डंखांचाही ताप वाढणार!File Photo
Published on
Updated on

आशिष शिंदे

कोल्हापूर : काळसर शरीर आणि पायांवर पांढर्‍या पट्ट्या असणारा एक मच्छर माणसाला ताप, प्रचंड अंगदुखी, उलट्या, अ‍ॅलर्जी, इतकेच नव्हे तर थेट मृत्यूच्या दारात घेऊन जाऊ शकतो. राज्यात गेल्या सहा वर्षांत तब्बल 74 हजारांहून अधिक जणांना डेंग्यूची लागण झाली असून, 188 जणांचा मृत्यू झाला आहे. यंदा ‘अल निनो’मुळे तापमानवाढ आणि अनियमित पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने डेंग्यू, मलेरिया डंख आणखी तीव्र होऊ शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जागतिक संशोधनानुसार, तापमानात केवळ 1 अंश सेल्सिअस वाढ झाली तरी डेंग्यू संसर्गाचा धोका 13 टक्क्यांनी वाढू शकतो.

‘आयएएमडी’च्या हेल्थ बुलेटिननुसार, 15 मे ते 28 मे या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डेंग्यूच्या प्रसाराची शक्यता 35 टक्क्यांपर्यंत आहे, तर मलेरिया प्रसाराची शक्यता 75 टक्क्यांहून अधिक आहे. ‘अल निनो’मुळे तापमान वाढणे, पावसाचे असमान प्रमाण, अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे घरांभोवती, बांधकामांमध्ये, टायर, कूलर, ड्रम किंवा छतांवर पाणी साचते आणि ते एडीस इजिप्ती डासांच्या प्रजननासाठी योग्य ठिकाण बनते.

एडीस इजिप्तीसाठी 25 ते 32 तापमान सर्वाधिक अनुकूल

डेंग्यू पसरवणार्‍या एडीस इजिप्ती डासांच्या वाढीसाठी आणि डेंग्यू विषाणूच्या प्रसारासाठी साधारणत: 25 ते 32 अंश सेल्सिअस तापमान सर्वाधिक अनुकूल मानले जाते. मान्सूनपूर्व उष्णता, त्यानंतर पडणारा पाऊस आणि दमट वातावरण, यामुळे महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबरदरम्यान डेंग्यूचा धोका अधिक वाढताना दिसतो.

‘हा’ डास दिसला तर सावध व्हा!

काळसर शरीर आणि पायांवर पांढर्‍या पट्ट्या असलेला एडीस इजिप्ती डास प्रामुख्याने दिवसा चावतो. स्वच्छ साचलेल्या पाण्यात वाढणारा हा डास डेंग्यू, चिकुनगुनिया आणि झिका विषाणू पसरवतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news