

कोल्हापूर : माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्या वतीने देण्यात येणार्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांची मंगळवारी घोषणा करण्यात आली. कोल्हापूर विभागातून ग. गो. जाधव उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2019 साठी दैनिक ‘पुढारी’चे पत्रकार एकनाथ नाईक यांना जाहीर झाला आहे.
ग. गो. जाधव उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2020 साठी दैनिक लोकमतचे पत्रकार भारत चव्हाण यांना, तर 2023 चा पुरस्कार दैनिक सकाळचे वरिष्ठ बातमीदार शिवाजी यादव यांना जाहीर झाला आहे. शासकीय गटातून मराठीसाठी राज्यस्तरावरील यशवंतराव चव्हाण पुरस्कार कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक प्रवीण टाके यांना 2019 मधील चंद्रपूर जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्यासाठी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती अधिकारी वृषाली पाटील यांना 2023 मधील कार्यासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 2019 च्या केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कारात कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयातील तत्कालीन छायाचित्रकार व सध्या गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठामध्ये सहायक प्राध्यापकपदी कार्यरत रोहित कांबळे यांना जाहीर झाला आहे.