स्थूलपणावर युरोप, अमेरिकेत प्रभावी ठरलेले औषध भारतीय बाजारपेठेत दाखल

बहुराष्ट्रीय इली लिलीच्या ‘टिरझेप्टाईड’ची औषध बाजारात एन्ट्री
effective-obesity-drug-from-europe-and-us-launches-in-india
स्थूलपणावर युरोप, अमेरिकेत प्रभावी ठरलेले औषध भारतीय बाजारपेठेत दाखलPudhari File Photo
Published on
Updated on
राजेंद्र जोशी

कोल्हापूर : स्थूलपणा आणि त्यामुळे निर्माण होणार्‍या विविध आजारांनी त्रस्त असलेल्या भारतीयांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. अमेरिका आणि युरोपात स्थूलपणाच्या आजारावर लोकप्रिय ठरलेले ‘टिरझेप्टाईड’ हे औषध भारतीय बाजारात दाखल झाले आहे. इंजेक्शनच्या स्वरूपात असलेल्या या औषधाच्या 2.5 व 5 मिलिग्रॅम औषधाच्या कुपीची किंमत अनुक्रमे 3 हजार 500 व 4 हजार 375 रुपये इतकी आहे. रुग्णाच्या प्रकृतीनुसार त्याचे डोस ठरविले जात असून या उपचारासाठी महिन्याला सरासरी 14 हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या औषधाला पाश्चात्त्य देशांमध्ये मिळणारा प्रतिसाद पाहून स्थूलपणाच्या रुग्णांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारतीय बाजारपेठेला औषध निर्मात्यांनी केंद्रित केले आहे.

अमेरिकास्थित इली लिली या बहुराष्ट्रीय कंपनीने हे औषध विकसित केले आहे. भारतामध्ये ‘मौंजारो’ या नावाने ते दाखल होणार आहे. इंग्लंड, अमेरिकेत प्रारंभी या औषधाचा वापर मधुमेहासाठी करण्यात येत होता. मधुमेहाला नियंत्रित आणण्यासाठी म्हणूनच त्याचे संशोधन झाले. परंतु, संबंधित औषध स्थूलपणावर अत्यंत गुणकारी परिणाम दाखवत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्थूलपणाशी निगडित असलेल्या हृदय आणि मूत्रपिंडाच्या विकारासाठीही हे औषध वापरण्यात येऊ लागले आहे.

औषधनिर्माण शास्त्रामध्ये ‘टिरझेप्टाईड’ या मूलद्रव्याचा ‘इनसर्टिन मिमेटिक्स’ या प्रवर्गामध्ये समावेश होतो. हे औषध मानवी आंतड्यामधील संप्रेरकांना (गॅस्ट्रोइंटेस्टाईनल हार्मोन्स) प्रवृत्त करते. यामुळे प्रामुख्याने तीन क्रिया घडतात. शरीरातील इन्सुलिनची निर्मिती वाढते शिवाय यकृतातील शर्करेचे प्रमाण वाढल्यामुळे निर्माण होणारी स्थिती रोखण्यासाठी ‘ग्लुकॅगॉन’ या पदार्थाचे उत्सर्जन कमी करते आणि भूक मंदाविण्यासाठी पचनाची क्रिया संथ गतीने होण्यास मदत करते. अशा प्रकारचे औषध भारतीय बाजारपेठेत प्रथमच दाखल झालेे आहे. त्याच्या वापराने भारतीयांच्या मुळाशी जडलेला स्थूलपणा कमी होण्यास मदत होऊ शकते. त्याहीपेक्षा मानवी स्थूलपणा हे हृदय, मूत्रपिंड, यकृत आणि डायबेटिस अशा विविध आजारांचे मूळ असल्यामुळे त्यावरच हल्ला झाला, तर स्थूलपणामुळे उद्भवणारे अनेक आजार नियंत्रणाखाली आणता येतील, अशी चर्चा वैद्यकीय वर्तुळात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news