

कोल्हापूर : एकेकाळी कला शाखा म्हणजे शेवटचा पर्याय अशी प्रतिमा होती. मात्र डिजिटल युग, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, स्पर्धा परीक्षांचे वाढते आकर्षण आणि सर्जनशील क्षेत्रातील रोजगार संधी, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे भाषेची व्यापकता यामुळे हे चित्र झपाट्याने बदलत आहे. यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेत विज्ञाननंतर कला शाखेकडे वाढता कल पाहता शिक्षण क्षेत्रातील बदलता ट्रेंड अधोरेखित झाला आहे.
जिल्ह्यात यंदा तिसऱ्या फेरीअखेर प्रवेश प्रक्रियेत विज्ञान ९८४०, कला ५१८६, तर वाणिज्य शाखेत ३,४५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. कला शाखा ही केवळ पारंपरिक शिक्षणाची वाट न राहता नव्या युगातील स्मार्ट, सर्जनशील आणि स्पर्धात्मक करिअरचा मजबूत पाया म्हणून उदयास येत आहे.
कला शाखेतून करिअरच्या संधी
नागरी सेवा : स्पर्धा परीक्षेतून प्रशासकीय अधिकारी
मीडिया : पत्रकारिता, न्यूज अँकर, डिजिटल एडिटर, पॉडकास्ट
डिजिटल कंटेंट इंडस्ट्री : कंटेंट, स्क्रिप्ट रायटर, सोशल मीडिया मॅनेजर, डिजिटल मार्केटिंग.
कायदा : वकील, कॉर्पोरेट सल्लागार
मानसशास्त्र : समुपदेशक, कल चाचणी तज्ज्ञ
परकीय भाषा : भाषा तज्ज्ञ, दुभाषी तज्ज्ञ, भाषांतर, अनुवादन, प्रकाशन
जनसंपर्क व जाहिरात : निवेदक, पीआर, ब्रँड,
कॉर्पोरेट कम्युनिकेशन
पर्यटन व हॉटेल उद्योग : टूर मॅनेजर, ट्रॅव्हल कन्सल्टंट, गाईड
समाजकार्य : एनजीओ, सीएसआर, ग्रामीण विकास, महिला व बालकल्याण क्षेत्र
शिक्षण व संशोधन : प्राध्यापक, शिक्षक, संशोधक, शैक्षणिक सल्लागार
क्रिएटिव्ह इंडस्ट्री : फॅशन डिझाईन, इंटिरिअर डिझाईन, इव्हेंट मॅनेजमेंट