उपमुख्यमंत्री शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर; 'शक्तिपीठ' महामार्ग कृती समितीचे कार्यकर्ते ताब्यात

Shaktipith Highway Protest | सरवडे येथे विकासकामांचे उद्घाटन
Shaktipith Highway Protest
शक्तिपीठ महामार्ग कृती समितीच्या बहुतांशी कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले आहे. Pudhari Photo
Published on
Updated on

कागल, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे विविध विकासकामांचे उद्घाटन आज (दि.५) करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शक्तिपीठ महामार्ग कृती समितीच्या वतीने मुदाळ तिट्टा येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. मात्र, निदर्शन करण्याचा इशारा देणाऱ्या कृती समितीच्या बहुतांशी कार्यकर्त्यांना तसेच नेतेमंडळींना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले आहे. त्यामुळे निदर्शने होणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Shaktipith Highway Protest)

कागल येथे लालबावटा संघटनेचे नेते शिवाजीराव मगदूम राष्ट्रीय काँग्रेसचे सागर कोंडेकर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षाचे मल्हार पाटील, हुन्नूर गावच्या सरपंच पूजा मोरे, दादासाहेब पाटील, सिद्धनेर्लीचे आनंदा पाटील यांना कागल पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये ठेवले आहे.

माजी आमदार संजय घाटगे यांना देखील त्यांच्या निवासस्थानी बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. निदर्शने करण्याकरता कोणीही जाऊ नये, यासाठी केनवडे फाटा येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विजय देवणे यांना देखील कोल्हापूर येथे ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे सायंकाळी निदर्शने होणार की नाही याबाबत चर्चा सुरू आहे.

Shaktipith Highway Protest
शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news