kolhapur | डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे दोन संशोधक देशात ‘टॉप टेन’मध्ये

डॉ. सी. डी. लोखंडे तिसर्‍या तर डॉ. प्रमोद पाटील आठव्या स्थानी
kolhapur | डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे दोन संशोधक देशात ‘टॉप टेन’मध्ये
Published on
Updated on

कोल्हापूर : पदार्थ विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या देशातील सर्वोत्कृष्ट संशोधकांच्या यादीत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरच्या दोन संशोधकाने ‘टॉप टेन’मध्ये स्थान मिळवले आहे. रिसर्च डॉट कॉम आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन मूल्यमापन संस्थेने जाहीर केलेल्या यादीत सेंटर फॉर इंटरडीसीप्लेनरी स्टडीजचे अधिष्ठाता डॉ. सी. डी. लोखंडे तिसरे तर संशोधन संचालक डॉ. प्रमोद एस. पाटील यांनी आठवे स्थान मिळवले आहे.

रिसर्च डॉट कॉमच्या अहवालानुसार देशातील अव्वल संशोधकांची निवड डी इंडेक्स, संशोधनपत्रांची गुणवत्ता, संदर्भ, आणि संशोधन क्षेत्रातील प्रभाव या निकषांवर करण्यात आली. डॉ. चंद्रकांत डी. लोखंडे यांचा डी. इंडेक्स, 108 असून त्यांच्या संशोधन कार्याला 41 हजार 764 हून अधिक संदर्भ प्राप्त झाले आहेत. जागतिक क्रमवारीत त्यांचा 725 वा क्रमांक आहे. डॉ. प्रमोद एस. पाटील यांचा डी. इंडेक्स 91 असून त्यांच्या संशोधनाला 29 हजार 160 हून अधिक संदर्भ मिळाले आहेत. जागतिक स्तरावर त्यांना 1554 वा क्रमांक मिळाला आहे. त्याचबरोबर विद्यापीठाचे संशोधक डॉ. उमाकांत पाटील यांनीही यादीत 185 वे स्थान मिळवले आहे.

त्यांच्या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आ. सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.

देशातील 263 संशोधकांचा अभ्यास करून यादी तयार

रिसर्च डॉट कॉमने यंदाच्या मानांकनासाठी विविध आंतरराष्ट्रीय डेटाबेसमधील माहितीचा आधार घेतला. देशातील 263 मटेरियल्स सायन्स संशोधकांचा अभ्यास करून ही यादी तयार करण्यात आली. संशोधकांच्या शैक्षणिक योगदानासोबतच त्यांच्या संशोधनाचा समाज आणि विज्ञान क्षेत्रावर झालेला प्रभावही विचारात घेण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news